पूरक विचार
शेतीव्यवसाय फायदेशीर करणे
शेतीव्यवसाय फायदेशीर करण्यात एक अडथळा म्हणजे कुठल्याही कुटुंबाकडे लहानमोठ्ठ्या प्रमाणात जमीन असली तरी त्या कुटुंबातील1-2 माणसेच व त्यांचे कुटुंब खेडेगावात असते. ते त्यांच्या वाट्याला असलेल्या जमिनीच्या हिश्श्यात शेती उत्पादन घेतात. इतर भाऊबंद शहरात असले तरी जमिनीवरील हक्क सोडत नाहीत व त्यामुळे बरीचशी जमीन पडूनच असते. याला वेगवेगळे पर्याय निघू शकतील. एक सुचलेला पर्याय असा —- शहरात गेलेली मंडळी परत खेड्याकडे येणे जवळजवळ अशक्यच असते. अशा मंडळींनी गावाला राहून जे शेती करत असतील त्यांना त्यांच्या हिश्श्याची जमीन 25 वर्षांच्या कराराने द्यावी. त्याचे उत्पन्न येईल त्यातील थोडाफार हिस्सा ज्याची जमीन आहे त्यांना मिळावा.
या संदर्भात आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. जे भाऊबंद शहरात जातात अशी मंडळी गणपती, होळी अशा सणांना गावी येतात. परंतू त्यामध्ये भक्तीभाव दिसण्याऐवजी उत्सव संपल्यावर दारूच्या बाटल्यांचा खचच पडलेला दिसतो. खेडेगावातील समाज अशा अनेक कार्यक्रमात गुंतलेला असतो. बारसे, लग्न, मयत या शिवाय गावागावातील देवदेवतांचे उत्सव असे अनेक प्रसंग. त्या प्रत्येक प्रसंगी संबंध गावच त्यामध्ये गुंतलेले असते. त्यामुळे पैसा व वेळ जातो व कामाला वेळ कमी मिळतो. एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पैसा निर्मिती ही श्रमातूनच होते. त्याला महत्व देणे गरजेचे असते. दुसरे एक असे आढळते की खेड्यात व काही अंशी तालुका व जिल्ह्यांच्या गावात बरीच घरे ढासळलेल्या अवस्थेत असतात. त्यांचे वारसदार येण्याची शक्यताही नसते. अशी घरे ताब्यात घेऊन सर्वजनिक कामांसाठी वापरावीत.
आणखी एका गोष्टीचा विचार करावा. गणपती उत्सव हा 10 दिवसांऐवजी 5 दिवस केला तर? इतरही अनेक 2-4 दिवस चालणारे उत्सव कमी कालावधीत करता येतील का? सध्याच्या काळात उत्पन्न व कामासाठी दिलेला वेळ याचे गणित जमवावयचे असेल तर हे असे करावेच लागेल असे वाटते.
व्यसनांबद्दल थोडेसे –
शारिरीक व मानसिक श्रमांनंतर तजेला आणण्यासाठी व्यसन हे मानवी जीवनाचे एक अंगच असते असे म्हणावे लागेल. व्यसन म्हणजे नेमके काय याची व्याख्या करणे कठीण आहे. परंतू सर्वसाधारणपणे आरोग्यविषक चर्चेत व्यसन हा शब्द वापरला जातो. त्यामध्ये कुठलेही द्रव्य प्रमाणाबाहेर घेतले गेले की आपण त्याला व्यसन म्हणतो. माफक प्रमाणात घेतल्यास सगळीच द्रव्ये काही धोकादायक नसतात. उदाहरणार्थ,
- चहा, कॉफी हे आपल्याकडे बहुतांशी लोक घेतात. वाईन, ब्रँडी, बिअर हे दारूचेच प्रकार. परंतू त्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. अशा द्रव्यांचे प्रमाणात सेवन करणे धोक्याचे नसते.
- व्हिस्की, रम अशा इतर अनेक प्रकारच्या दारू या सदरात मोडणार्या द्रव्यांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. त्याचा वापर काळजीपूर्वक करावा.
- गावठी दारू ही घातकच असते. कारण त्यामध्ये इतर द्रव्ये मिसळतात व ती तब्येतीला विशेषतः लिव्हरला धोकादायक असते.
- “गर्द” या नांवाखाली येणारे व्यसनी पदार्थ मात्र घातकच असतात. इतकेच नाही तर त्यातून व्यसनमुक्ती अत्यंत कठीण असते. त्यामुळे मृत्यू, हे जवळजवळ ठरलेलेच असते.
- तंबाखू हा मात्र दीर्घकालीन सेवनाने घातकच असतो. सिगारेट/बिडी या सारखे व्ससन म्हणूनच घातक असते.
- सुपारी हा जेवणानंतर अथवा इतर वेळी घेतला जाणारा पदार्थ. त्याची काही जणांना अलर्जी असते.
थोडक्यात वरती उल्लेख केलेल्या कुठल्याही पदार्थाचे सेवन करतांना मनाचा तोल जाणार नाही व आपण व्यसनाधीन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
पुढील सत्रात आपण शहरी मंडळींच्या आयुष्याचा, विशेषतः तरूण व लहान मुलांचे पालक यांच्या जीवनाचा मागोवा घेऊया.
October 2022
Supportive Thinking
Problems of land related matter and addictions
A farmer in any village may have a small piece of land, say few gunthas, or an acre or few acres. The problem is, it belongs to 4-5 members of the family. Mostly one of the family members stay in a village, while others migrate to city life for earnings. In that case the land belonging to the city dwellers in the family remain as barren land. This problem needs solution so that a farmer staying in a village can use that land for agriculture providing him livelihood. One way of resolving this issue is as follows –
It is almost impossible that those accustomed to city life return to a village and engage in agriculture. It is possible that they give the land to the one staying in village on lease basis for 20 to 25 years. The terms and conditions for using their land for agriculture need to be decided by mutual understanding. One more observation worth noting – relatives staying in city come for religious functions like Ganpati, Holi etc. There is hardly any devotion in it. Rather the time is used for enjoyment. After the event one can see heaps of wine bottles adjacent to streets. People in villages are engaged in such functions quite often. Twelfth day of birth when the child gets his name, marriage, death of someone, and also number of events related to local Gods, Goddesses are occasions wherein all villagers participate. In terms of money and time it is a huge loss to productive time, we must remember that money comes only through hard work.
Another observation in villages and to some extent at taluka and district places there are houses in dilapidated conditions. The possibility of owner of such houses, returning to stay there is almost nil. Such houses can be utilised for public utility after meeting legal requirements.
Ganpati celebration is of 10 days. Can we make it 5 days? Similarly other such events can be minimized. In changing world if one thinks of time for work and income generated and it is essential that we start thinking seriously on such issues.
Addictions –
History of human society reveals that after physical exhaustion or intense psychological engagement people turn some form of addiction. It is difficult to define the meaning of addiction. From medical angel anything beyond limits can be termed as addiction, if consumed in small quantities all the items cannot be termed as harmful.
- Drinking tea or coffee is common in India. Wine, beer, brandy are alcoholic beverages. The percentage of alcohol is small in it. These are not harmful if consumed in small quantity.
- The percentage of alcohol in whisky, rum etc is high. They are to be used with caution.
- Country liquor is certainly bad as quite often it contains toxic material dangerous especially to liver.
- What is generally sold under the name ‘Gard’ is definitely bad. Once addicted it is difficult to come out of it. Generally, it leads to early death.
To sum up, it can be said that one has to be careful not to become an addict to anything. Understanding and self-control is essential.
In next session we will discuss the life of youths and parents in city life.