जानेवारी 2023

पूरक विचार

इकिगाई

संदर्भ : तरूणांसाठी इकिगाई

लेखक – हेक्टर गार्सिया, फ्रान्सेक मिरालेस

अनुवाद – प्रसाद ढापरे

माय मिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे

(भाग 2)

सध्याची परिस्थिती व आपणापुढील प्रश्र्न

मागील सत्रात अगदी शेवटी वेगवेगळे व्यवसाय तुम्हाला सुचविले होते. त्या शिवायही अनेक असू शकतील, नाही आहेतच. आता पुढची पायरी म्हणजे त्यातला एक मार्ग निवडून सुरवात करा. काही दिवसांनी किंवा महिन्यांनी किंवा काही वर्षांनी सुध्दा तुमच्याच लक्षात येईल की हे काम मला जमत नाही किंवा ते करण्याचा मला कंटाळा येतो. याचाच अर्थ तुम्ही तेथेच अडकून पडलात तर तुम्ही नेहमीच असमाधानी, दुःखी रहाल. अशावेळेस दुसरा मार्ग निवडा. तो सुध्दा चुकला तर तिसरा. असे झाले तर एक यादी करा. शांतपणे बसा व अनेक व्यवसायांपैकी मला काय येणार नाही किंवा आवडणार नाही याची ती यादी असेल. आता त्यानंतर परत शोध घ्यायला सुरवात करा. एकट्याने नाही. तुमच्या सारखेच व्यवसाय सापडलेले, न सापडलेले असतील. त्यांच्याशी चर्चा करा. त्यामुळे तुम्हाला अजून एक यादी करता येईल. त्यामध्ये हे नवीन व्यवसाय असतील. त्यापैकी एकाची निवड करून परत सुरवात करा.

  1. पहिला प्रश्र्न विचारा –

2. दुसरा प्रश्र्न विचारा –

3. तिसरा प्रश्र्न विचारा –

येथे एक लक्षात घ्या. तुम्हाला आवडणारे व येत असलेले काम मिळाले की प्रेरणा येतेच.

त्या बरोबर पैशाचा पण विचार करावा लागतो.

4. चौथा अजून एक प्रश्र्न –

ही वर्तुळे लक्षात घेऊन विचार करून तुमच्या व्यवसायाची निवड करा.

लोकांना काय हवे आहे याचा विचार केलात की तुम्हाला जगाकडून प्रेम मिळते. त्यासाठी तुम्हाला तीन गुण अंगी बाणवावे लागतील. ते म्हणजे — विश्वास, प्रेम, व प्रामाणिकपणा. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

पुढील गोष्टी लगेचच अमलात आणणे चालू करा —

  1. मोबाईल जेवढा बंद ठेवाल तेवढा तुमचा वेळ तुमच्या प्रगतीच्या कामाला देता येईल.
  2. शक्य असेल तेवढे निसर्गाच्या जवळ रहा.
  3. नियमित व्यायाम करा.
  4. जेवणात पचणारे व पोषक अन्न घ्या.
  5. चांगल्या मित्रांचा समूह वाढवा.
  6. जे काम आवडते ते अखंड करत रहा.
  7. व्यसनापासून दूर रहा.

असे केल्याने कधीतरी तुम्हाला नक्कीच कळेल की तुम्ही “ इकिगाई ” साध्य केली आहे.

तुम्ही अनुभवाल

मी समाधानी आहे, मी आनंदी आहे

चला तर मग जोमाने सुरुवात करुया.

January 2023

Supportive Thinking

Ekigai

Reference: Ikigai for Youths

Author — Francesc mMiralles and Hector Garcia

Translated by — Prasad Dhapare

My Mirror Publishing House, Pune

Part – 2

Current situation and problems in front of us

You were suggested different occupations in last session. There may be many more occupations other than these occupations. Now next step.

From the different suggested occupation, select one and start doing it. After some time or months or years you will feel that you are not able to do that work properly, you become tired of doing it. If you left yourself there you will always remain unsatisfied and unhappy. Choose another path.

In such situation select another path. If it is also going wrong select third one. Sit quietly and make a list of occupations which you are not able to do or you don’t like to do. Then again start searching job, but not alone. There may be many people around you, who are like you, either doing any work or not doing any work. Discuss with them. From the discussion you can make another list which will include new occupations. Now select any one occupation from this list and start doing work once again.

  1. Ask first question,

2. Ask Second question,

3. Ask third question,

Remember one thing here, you will definitely get motivation, if you get work which you are able to do and which you like more. But at same time, we have to think about money also.

4. Now one more question, What do people want?

Consider all above mentioned circles. Think over it and then choose your money. If you think over what do people want you will get love from everyone. To attempt this, you need to inculcate three qualities among yourself, which are love, honesty and integrity.

Try to do following things immediately-

  • Switch off your mobile phone. Because of it you will be able to give more time for your progress.
  • As much as possible live near nature.
  • Do exercise regularly.
  • Eat digestive and nutritional food.
  • Increase a group of good friends.
  • Keep on doing the work which you like more.

After following this definitely at one point, you will come to know that you have fulfilled ‘Ekigai’. I am happy and satisfied. Come on let’s start strenuously.