शेती व्यवसाय व्यवस्थापन
( स्थानिक शेतकर्यांशी चर्चा करून मिळवलेली माहिती)
कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशींमध्ये पुढील पिके घेता येतात. भात, कुळीथ, उडीद, मूग, तूर, चवळी, वाल, मटकी, हरभरा, नाचणी, तीळ, सूर्यफूल इत्यादी.
शेती करण्याचे मुख्यतः दोन हंगाम आहेत. खरीप हंगाम व रब्बी हंगाम.
- खरीप हंगाम – पावसाळ्यात जेव्हा शेती करतात त्या दिवसांना खरीप हंगाम म्हणतात. जून ते नोव्हेंबर हे खरीप हंगामाचे महिने. या हंगामात जून-जुलै महिन्यात पिकांची पेरणी केली जाते व ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कापणी केली जाते. या हंगामात इथे साधारणतः भात, नाचणी, कुळीथ, तीळ, मूग, तूर ही पिके घेतली जातात.
- रब्बी हंगाम – हिवाळ्यात शेती करतात तो असतो रब्बी हंगाम. रब्बी हंगामचे महिने आहेत ऑक्टोबर ते मार्च. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पेरणी केली जाते व कापणी होते फेब्रुवारी-मार्च महिन्यात. या हंगामात साधारणतः जिरेसाळ जातीचा भात, पावटा, मटकी,हरभरे, वरणा (वाल) अशी पिके घेतली जातात.
- उन्हाळी हंगाम – खरीप व रब्बी या पावसाळी व हिवाळी हंगामांशिवाय तिसरा एक हंगाम असतो उन्हाळी हंगाम. या हंगामाचे महिने आहेत मार्च ते जून. हा हंगाम दोन मुख्य हंगामातील “आंतर भराव” म्हणून देखील ओळखला जातो. या हंगामात कुळीथ, उडीद, तूर, मूग, सूर्यफूल इत्यादी पिके घेतली जातात.
म्हणजेच संपूर्ण वर्षभर शेती केली जाते किंवा करता येते अस म्हणायला हरकत नाही. अस असूनही येथील शेतकर्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.या अडचणी कोणत्या ते समजून घेण्याचा प्रयत्न करुया.
- कोणत्याही हंगामाचा विचार केला तरी उत्पादन किती होईल ते उपलब्ध जागेवर अवलंबून असते. जास्त क्षेत्रफळावर उत्पादन घेतले तर घरासाठी वापरून जास्तीच्या उत्पादनाची विक्री करता येते. परंतू उत्पादनच जर कमी झाले तर मात्र ते फक्त घराच्या वापरापुरते मर्यादीत होते व विक्रीसाठी काही धान्य शिल्लक रहात नाही.
- उत्पादन जास्त व मालाची प्रत चांगली असेल तर त्याला योग्य असा बाजार भाव मिळतो. अशा परिस्थितीत शेती करणे नक्कीच फायदेशीर होते. अन्यथा शेती करून नफा मिळणार नाही व शेती करणे नुकसानीचेच होईल.
या अशा परिस्थितीत मुख्यतः कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते ते पाहणे महत्वाचे आहे. शेती करतांना येणार्या मुख्य दोन अडचणी आहेत. (1) पाण्याची सोय व (2) पिकांचे संरक्षण.
- ज्या जमिनीत पीक घ्यायचे असते त्या ठिकाणी किंवा जवळपास पाण्याची सोय असणे जरूरीचे असते. पाण्याची पुरेशी सोय नसल्यास शेती व्यवस्थित करता येत नाही. इतकेच नाही तर शेती करण्यात नुकसानही होऊ शकते.
- कोकणात वानर, माकडे, डुकरे यांचा उपद्रव खूप होतो. त्यामुळे पिकांचे संरक्षण करणे कठीण जाते. हे प्राणी उत्पादनाचे बर्याच प्रमाणात नुकसान सुद्धा करतात.
June 2022
Management of Agriculture
[ Information gathered from local farmers ]
Following crops can be grown in Konkan region. Rice, Kulith, Udid, Mug, Tur, chavli, val, matki, Harbhara, nachani, Til, sunflower etc.
It can be grown mainly in 2 seasons.
- Kharif season – from June to October in rainy season. Sowing takes place in June-July. In October- Nov. the produce is ready. Rice, nachani, kulith , til ,mug, tur are grown in this season.
- Rabbi season – From October to march. Sowing is done in October -Nov. while cutting takes place in Feb. – March. A different kind of rice, pavta, matki, harbhara, val are grown in this season.
- Summer season – wherever water availability is there , in summer months from March to June one can grow udid, sunflower, tur, mug etc.
If that is the case, why agriculture is in loss? There are multiple problems.
- Availability of land – Anything grown on a small piece of land may be sufficient for household use. Manpower has to be from owner’s house. Otherwise, it becomes costly. If the area is sufficiently large one can have produce for sale. Considering the manpower required and other factors, profit margin is low.
- The quality of produce as well as post-harvest conservation are the factors to be considered.
- Monkeys, pigs and such animals are responsible for huge losses.