पूरक विचार
जीवनशैली: एक नवीन प्रयोग
प्रयोग
संदर्भ: Dr. S. S. Apte यांचे लेख
मागील लेखात मांडलेल्या समस्या या समाजजीवनाशी निगडीत आहेत. हे वाचकांच्या लक्षात आले असेल. त्या सोडवायला, किंवा त्यांना सामोरे जायला असे म्हणूया, आपणा सर्वांसाठी एक प्रयोग सुचवित आहे. असा हा प्रयोग अगोदर कुठे झाला आहे का? ते यशस्वी किती झाला ? वगैरेचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला प्रयोगाची मांडणी करायला सोपे जाईल. तेव्हा त्याबद्दल अगोदर विचार करूया.
इंगल या मानसशास्त्रज्ञाने मांडलेल्या माणसाच्या संकल्पनेत थोडाफार फेरफार करून आपल्या विषयाला पूरक अशी माणसाची प्रतिकृती (Model) वरती आकृती नं.1 मध्ये दाखविली आहे. त्यातील खालचा भाग म्हणजेच आपले शरीर व त्यातील घटक, हे निसर्गनिर्मित आहेत. आकृतीमधील वरचा जो भाग आहे, जो आपण मनाने अनुभवतो, त्यातील बरेचसे घटक हे आपल्या समाजजीवनाशी निगडीत आहेत. किंबहुना आपण जेव्हा आपल्याबद्दल किंवा दुसऱया कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा त्या व्यक्तीच्या समाज जीवनाबद्दलच बोलतो. आपण एक शब्दप्रयोग वापरतो, ’माणूस शरीराने व मनाने जगतो“. त्याचा गर्भितार्थ वरील प्रतिकृतीत दिसतो. थोडासा विचार केला तर लक्षात येईल की निसर्गाने निर्माण केलेली ही जी शरीरकार्य रचना (system) आहे, ती अतिशय कार्यक्षम आहे. त्यामुळेच आपण बऱ्याच अंशी निरोगी राहू शकतो. या शरीरकार्य रचनेच्या व्यवस्थापनाबद्दल (management) बरीचशी माहिती आपणाला झाली आहे. पुढील आकृति नं. 2 पहा.
त्यामध्ये दाखविल्याप्रमाणे पेशी हा या व्यवस्थेचा मूलभूत घटक. कोट्यावधी पेशी शरीराच्या वेगवेगळ्या कार्यात भाग घेतात. हदय व रक्त वाहिन्यांच्या पेशी रक्त पुरवठा करतात. अन्न नलिका, जठर, आतडे, लिव्हर इत्यादी अवयवांच्या पेशी अन्न पचनाचे काम करतात. या वेगवेगळ्या कामांवर नियंत्रण व त्यामध्ये सुसुत्रता आणण्याचे काम मेंदू करतो. त्यापासून धडा घेऊन आपण वरच्या भागामध्ये (जे आपल्या जगण्याचे प्रमुख अंग आहे) म्हणजेच समाजव्यवस्थेमध्ये काही करू शकतो का याचा विचार करूया. त्याआधी आपले शरीर व्यवस्थापन व समाज व्यवस्थापन यांची तुलना करायची झाली तर कशी करता येईल ते बघूया. त्यासाठी पुढील आकृति नं. 3 लक्षपूर्वक, तुलनात्मकदृष्टया पहाणे जरूरीचे आहे.
मेंदू (मन) | सरकार | |
इंद्रीयकार्य रचना | प्रांत | |
इंद्रिये | गावे | |
पेशी समूह | कुटुंब | |
पेशी | व्यक्ती |
आता व्यवस्थापनाची तुलना करूया.
1) शरीर व्यवस्थापन पेशींचा कार्यक्रम निसर्गानेच आखलेला असतो. नवीन पेशी निर्माण होणे, ती वाढणे, कार्यक्षम होणे, तिचे पुनरुत्पादन होणे व जुनी पेशी नष्ट होणे हे ठराविक काळातच होते. 2) पेशीला जी पोषक द्रव्ये दिली जातात त्याचा उपयोग पेशी दिलेले कार्य करण्यासाठी करते. जनुकांमार्फत हे नियंत्रण होते. 3) महत्वाचे म्हणजे पेशीचे कार्य त्या त्या अवयव कार्याला व शरीर स्वास्थ्याला पूरक असेच असते. 4) पेशीवरच्या नियंत्रणामध्ये काही कारणाने गडबड झाली तर अनेक रोग उद्भवतात, अगदी कॅन्सर सुध्दा! | 1) समाज व्यवस्थापन समाजाचा एक घटक म्हणून माणूस अनेक वर्षे जगत आहे. बुध्दी सामर्थ्याने त्याने शरीर विकास, आरोग्य रक्षण, समाजाचा घटक म्हणून येणारी जबाबदारी, पुनरुत्पादन व मरण याबद्दल विचार करून समाजव्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला. 2) मनुष्यही सुखी जीवनासाठी पैसा (जो त्याला समाजामध्ये जगायला आवश्यक ते घटक देतो व सुखसोयीही पुरवितो) वापरतो. 3) मनुष्याकडे बघितले तर असे लक्षात येते की तो स्वतसाठी व कुटुंबासाठी झटत असतो. समाजाचा विचार फारच क्वचित करतो. 4) सध्याच्या आपल्या समाजजीवनाच्या समस्यांचे (रोगांचे) मूळ म्हणजे माणसाचा मनावरील सुटलेला ताबा व अविचारी जगणे. 5) याला उपाय म्हणजे विचारपूर्वक आपल्या, कुटुंबाच्या व समाजाच्या स्वास्थ्यासाठी कार्यरत रहाणे. |
वरील उपायाचा धागा पकडून जर प्रयोग करायचा झाला तर प्रत्येक माणसावरच जबाबदारी येते. ती काय असेल? त्याला त्याची माहिती कशी होईल? हे कोण करणार? असे अनेक प्रश्र्न आपल्या मनात निर्माण होतील त्यासाठी आपण या प्रयोगातून काय साधणार आहोत व त्यासाठी काय विचार करावा लागेल ते बघूया.
- सुखी जीवनासाठी माणसाला आरोग्य व पैसा लागतो. इतकेच नाही तर तो मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन लागते.
- शहर, खेडेगाव या स्तरांवर प्रयोगाची आखणी वेगवेगळी करावी लागेल.
पुढील लेखात (फेब्रुवारी 2023) सुखी जीवनाचे आवश्ययक असे अंग म्हणजे पैसा, त्यावर विचार करूया.
November 2023
Supportive thinking
Thinking and Thoughts
Ref.: Articles by Dr. S.S. Apte
The problems mentioned in the previous article are really related to social life. The readers must have noted this. In order to solve the problems, rather to lessen the burden of it, I am suggesting an experiment for all of us. Was such an experiment undertaken earlier? How far it was successful? If we study that it may be conducive to design the present experiment. Let us consider it first
The model of Man as conceived by Engle, a psychologist, is shown in figure one with few modifications to suit our purpose. The lower part of the figure denotes our body and its components which are created by nature. The upper part, we experience with mind and its components are related to our social life. In fact when we talk about ourselves or any other person we think of his social life. We use a phrase “Man lives with his body, as well as mind”. The deeper meaning of this dictum is precisely implied in this model. If we think for a while it will be evident that the functioning system of our body created by nature is extremely efficient and that is the reason we do not fall sick often. We have a lot of information about management of this body system. Look at the fig 2 carefully –
As shown in the figure 2 cell is the fundamental functional unlit of this system. Millions of cells participate in various functions of our body. Cells of heart and blood vessels provide blood to all organs in our body. The cells of stomach, intestine, liver etc. perform digestive functions. The brain controls and co-ordinates all these functions. We shall now try to find out whether it is possible to apply some of the principles of this body function system to the social aspect of our being which is shown in upper part of figure 1. For this let us compare body functions system with our social system. Please study the figure 3 for comparison.
Body Function System 1. Cells are programmed. It means they are endowed with machinery for growth, maintenance, functions, regeneration and death. 2. A cell uses nutrients for the purpose for which they are provided. It means cell uses its “controls” for growth, maintenance, functions, regeneration and death. 3. Important aspect of it is that a cell functions in concert with the whole so that health is maintained. The integrative mechanism is not known. 4. If the ‘controls’ over cellular function are lost various diseases, including cancer develop. | Social System 1. Man is living as a social animal for millions of years. Various knowledges have evolved to deal with growth, maintenance, function, regeneration and death of an individual. 2. Man uses money (which provides nutrients as well as comforts) brought by him for growth, maintenance etc. 3. Important difference is man functions more often for self and family and rarely takes cognizance of the society. 4. The basic reason for today’s society ills is the loss of ‘Self control’ and poor understanding of what constitutes integration or holism. 5. In terms of practice the solution lies in the use of resources including money for maintenance of not only self & family but society too. |
It is evident that in body functioning system every cell participates and cooperates in the stability of the whole system. Similarly in the context of social system it is necessary that every individual discharge his duties for maintenance of self and the society. What is his/her duty? How anyone knows about it? Who will teach him? To get answers to such questions let us see the objective of our experiment and how to think on it.
- For happy life a person needs financial stability and health. He also needs guidance with respect to both these components.
- Suitable changes are necessary in experimental details when one is dealing with a city or village.
In next session (Feb 2024) we will see financial aspect of our life and living.