शेती व्यवसाय व्यवस्थापन
जमीन, पाणी, सूर्य प्रकाश, हवा या घटकांचा शेतीच्या दृष्टीकोनातून आपण विचार करुया.
1. जमीन –
रत्नागिरी व सिंधूदुर्ग या जिल्ह्यात लागवडीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर तेथे खालील प्रकारची जमीन आढळते.
i. खडकाळ – यामध्ये मोठ्ठ्या आकाराचे दगडही आले.
ii. लहान लहान ठिसूळ दगड असणारी, मातकट रंगाची जमीन.
iii. जास्त माती असलेली.
iv. ओढा किंवा नदीजवळची.
v. खाडी लगतची.
याशिवाय गुणवत्तेच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर याच सत्रात डॉ. भट्टाचार्य यांनी संशोधनाबद्दल लिहिलेले लिखाण दिले आहे.
एक प्रश्र्न येतो की माती परिक्षण करावे की नाही? व्यावहारिक दृष्टीने विचार करता कुठल्याही एकाच प्रकारची लागवड जर 1-2 एकरांपेक्षा जास्त जागेत करावयाची असेल तर माती परिक्षण करणे चांगले. याचे कारण असे की, घेणार असलेल्या पीकाला पोषक द्रव्ये किती प्रमाणात द्यावीत हे कळते.
माती परिक्षण कसे करावे?
ज्या जमीनीमधील माती परिक्षण करायचे आहे त्याच्या चारही कोपर्यावर साधारण 1 मीटर आतमध्ये 1 फूट खोल व 9 इंच * 9 इंच असे खड्डे खणावे. त्या प्रत्येक खड्डयातील 2 ओंजळी माती घ्यावी. अशी सर्व माती एकत्र मिसळावी व माती तपासणार्या प्रयोग शाळेत पाठवून तपासणी करावी. किंवा माती तपासणीसाठी संच मिळतो. गृपमध्ये संच घेऊन माती तपासणी जागेवरच करता येते.
सुरवातीला लागवडीच्या दृष्टीने जमीनीची जी विभागणी दिली आहे त्याप्रमाणे उत्पादनाचा विचार खालील प्रकारे करता येतो.
i. खडकाळ जमीन – यामध्ये जंगली झाडे (लाकूड सामानासाठी), तसेच त्यामध्ये काही भागात थोडीशी माती असेल तर काजू अथवा रायवळ आंबा लावण्याचा विचार करावा.
ii. लहान ठिसूळ दगड व माती असलेली – योग्य प्रकारे मशागत करून फलोत्पादन, औषधी झाडे, फुलझाडे अशा विविध प्रकारची लागवड करता येईल.
iii. जास्त माती असलेली – रब्बी हंगामातील कडधान्ये, तीळ, सूर्यफूल अशी पिके घेता येतील.
iv. ओढा किंवा नदीकाठची – भातशेती, वेगवेगळ्या भाज्या,भाजीपाला इ. चे पीक.
v. खाडीलगत – मत्स्यशेती, भातशेती.
वर दिलेल्या विचारांबाबत काही बदल/सूचना/कल्पना सुचत असतील तर जरूर कळवाव्यात.
2. पाणी –
पाण्याच्या दृष्टीने कोकण प्रदेश मोठ्ठा मजेदार आहे. येथे पाऊस भरपूर पडतो. परंतू भौगोलिक दृष्ट्या जमिनीला अधिक प्रमाणात उतार असल्याने पाणी वाहून जाते. त्याच्याबरोबर मातीही जाते ते वेगळेच. पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने येथे 3 प्रकारे प्रयत्न झालेले दिसतात.
i. पारंपारिक विहिरी
ii. बोअर वेल
iii. नदीला बंधारे
i. पारंपारीक विहिरी – पाणी कोठे लागेल याचा अंदाज घेण्याच्या स्थानिक समजुतींनुसार बर्याच पध्दती आहेत. पायाळू माणसाला ते ज्ञान असणे, हातात नारळ घेऊन फिरले की पाणी असेल त्या जागी नारळ वाकडा होऊन खाली पडणे, मंत्रोच्चार करीत तपास इत्यादी. यातील कुठल्याही पद्धतीची कारणमिमांसा अगर वैज्ञानिक दृष्टीकोनातून या गोष्टींचा अभ्यास झालेला नाही. तसा होणे जरूरीचे आहे. सध्यातरी नशीबावर हवाला ठेऊन खणून बघणे असेच प्रयोग करावे लागतात.
ii. बोअर वेल – मशीनच्या सहाय्याने याचा शोध घेतात. पहिल्याच वेळेस जरी यश मिळाले नाही तरी पावसाळ्यानंतर उपसा करीत गेले तर 2-4 वर्षात पाणी कमीजास्त प्रमाणात मिळू लागते असा अनुभव आहे. दुसरा एक प्रयोग करून बघता येतो. बोअर वेलला पावसाचे पाणी वरून सोडणे. कौलावरील पाणी पन्हळावाटे त्यात सोडता येते. बोअर वेलच्या पाईपवर फनेलच्या आकाराचे साधन बसवून पावसाचे पाणी आत सोडता येईल.
iii. नदील बंधारे/लहान धरणे –
बंधारे : स्थानिक लोक एकत्र येऊन तज्ञांच्या सल्ल्याने बंधारे बांधू शकतात. पावसाळ्यात पाण्याचा वेग जास्त असल्याने बर्याच वेळा असे बंधारे टिकत नाहीत असा अनुभव आहे.
एक निरिक्षण व त्यावर आधारीत प्रयोग येथे सुचवीत आहोत. शेतीदवाखान्याच्या जागेत उतारावर आम्ही लहान दगडांचे चित्रात दाखविल्याप्रमाणे बांध घातले आहेत. खालील फोटो पहा. (फोटो नं. 1)
तसेच जागेला चिर्याचा गडगा आहे तेथे लहानसा चर खणला आहे. त्याचा उद्देश असा की पावसाळ्यात उतारावर पावसाचे पाणी गडग्याच्या बाहेर जाण्यापूर्वी पाणी चरातून गेल्यामुळे उतारावर पाण्याबरोबर आलेली माती चरात साठवली जाईल व ती वापरता येईल. व पाणी वाहून जाण्यापूर्वी चरात साठून काही वर्षांत जागेतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. या वर्षी पावसाळ्यानंतर असे आढळले की, नंतर आलेल्या पावसात सगळीकडे परत गवत उगवले आणि कालांतराने परत परत येणारा पाऊस थांबल्यावर ते वाळले. या चराजवळ असणारे गवत मात्र जानेवारी 15 तारखेपर्यंत हिरवे राहिले होते. खालील फोटो पहा. (फोटो नं. 2) (नंतर मात्र आम्ही तेही गवत कापून टाकले).
यावरून एक कल्पना सुचली ती अशी की बंधार्याच्या आधी, मग तो लहान असो किंवा नदीतील मोठ्ठा, चर खणला तर मातीही वाहून जाणार नाही (जी पुढे वापरता येईल) व पाणी मुरण्याची क्रिया जास्त होऊन पाण्याची पातळी वाढेल.
3. सूर्यप्रकाश –
झाडांच्या वाढीसाठी व अन्न बनविण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. परंतू प्रत्येक झाडाला आवश्यक असलेल्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण समान नसते. काही झाडांना कमी तर काही झाडांना जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. उदाहरण द्यायचे झाले तर पपनसाच्या झाडाचे देता येईल. शेती दवाखान्याच्या आवारात एक पपनसाचे झाड लावले आहे. त्याची वाढ योग्य प्रमाणात होत नव्हती. नंतर तज्ञांकडून माहिती मिळाली की पपनसाच्या झाडाला सुरवातीच्या काळात झाड लावल्यावर 2/3 वर्षे जास्त सूर्यप्रकाश चालत नाही. म्हणून उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये झाडावर सावली येईल अशी व्यवस्था केली. त्यानंतर झाडाची वाढ चांगली झाली. त्यामुळे कोणत्याही झाडाची लागवड करतांना त्या झाडाला किती सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे हे जाणून घ्यावे व त्या प्रमाणे त्या झाडाला सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था करावी.
4. हवा –
हवा अनेक वायूंच्या मिश्रणाने बनलेली आहे. झाडांच्या वाढीसाठी शुद्ध हवेची आवश्यकता असते. हवा प्रदूषित करणार्या घटकांचा झाडावर वाईट परिणाम होतो. झाडे खूप काळ प्रदूषित हवेत असतील तर कमजोर होतात, त्यांची वाढ सुद्धा चांगली होत नाही. अशा झाडांवर कीटक हल्ला करण्याचे प्रमाण वाढते. किंवा वातावरणातील विविध घटकांचा वाईट परिणाम झाडावर सहज होतो. ओझोन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन, हायड्रोजन क्लोराईड, इथिलीन इत्यादी हवा प्रदुषीत करणारे घटक आहेत. हे घटक वेगवेगळ्या झाडांवर वेगवेगळा परिणाम करतात. त्यामुळे झाडांना शुद्ध हावा योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक आहे.
March 2022
Management of Agriculture
Soil, water, sunlight and air are the environmental factors affecting plants. We will consider each factor separately.
1. Soil –
In Ratnagiri and Sindhudurg districts following division of soil variety can be considered from plantation point of view.
i. Rocky – Consisting of very big, medium sized hard stones.
ii. Hard but brittle small stones, and little reddish coloured soil.
iii. More of soil.
iv. Adjacent to river or streamlet.
v. Near the creek.
Qualitative aspect of Kokan soil from nutritional point of view are briefly mentioned under Research section in the same issue.
Whether the soil test is necessary before plantation is a frequently asked question. It is advisable to do a soil testing if one is going to use 1 or 2 (or more) of land for one variety of plantation. It gives an idea about the nutritional aspect of plantation, indicating deficiency or excess of a particular element like Potassium, Iron etc.
Soil Testing –
Dig a pit 1 foot deep, 9 inches * 9 inches on 4 corners of the plantation area. Collect about 2 handful of soil from each of the 4 pits. Mix lit well and send it for examination to an approved laboratory for testing.
One can think of plantation in the following way –
i. Rocky area – Plants providing wood for furniture. Also, there are few patches of soil, in such area where cashew, mango can be grown.
ii. Brittle stones and soil – With proper cultivation of land horticulture can be thought of.
iii. More of soil – Rabbi plantation like sunflower, sesame, cereals etc.
iv. Near River – Rice, vegetables.
v. Near creek – Fish plants, Rice etc.
2. Water –
It is important to note that Kokan has good amount of rainfall. But, due to steep slope of the land most of the water along with soil is drained away. Following methods ae adopted for water conservation.
i. Traditional well
ii. Bore well
iii. Bank of small stones in the river, small dams.
i. Traditional well –
There is not any satisfactory method to detect underground water source. Villagers claim success with different methods like chanting mantras, walk with coconut in the hand, coconut will get tilted as you go near source of water, etc. None has been tested methodically although it is necessary to do so.
ii. Bore well –
Machines are available to detect a point and dig the borewell. It is found that quite often initially there may not be a flow of water but in rainy season if we put the pump and operate it, after 2-3 years the water may be available. One can also try putting rain water drained from roof of the house during rainy season in the borewell. Water level is likely to increase in the borewell after rainy season.
iii. Bann of small stones in the river, small dams –
Villagers can put small stone banns at proper places in the river with help of experts. Due to turbulent water flow generally, some repair may be necessary every year.
We are suggesting an experiment based on our observations. Near our plant clinic, the land has slope. We put veins of small stones to prevent drainage of water. We dug a ditch near fence so that water may not dash the fence with force and soil also can be preserved. (See the photo below)
This year we observed that after rainy season everywhere there was dried grass. The area near the fence had green grass. (See the photo below)
It is possible that water storage in the ditch for some time might have led to little rise of underground water. One can try similar method near river bank.
3. Sunlight –
For proper growth and make food like sugar, protein etc. plants need sunlight. The requirement varies with the type of plant. For e.g. Papnas tree needs less sunlight. We have planted a Papnas tree near plant clinic. In the first year itself the growth was not adequate. On advice from an expert, we made arrangement to protect lit from sunlight and the growth was proper. Therefore, due attention should be given to this aspect.
4. Air –
Air is a mixture of many gases. Plant needs clean air. Otherwise, their growth is hampered and leaves may turn black. Insects attack such plants more readily. Ozone, Sulphur dioxide, Nitrogen, Hydrogen chloride etc. are detrimental to the quality of air.