(रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील शेती व्यावसायिकांसाठी)
प्रास्ताविक
नमस्कार,
‘संवाद’ हे व्यासपीठ मुख्यत: तरूण शेती व्यावसायिकांसाठी आहे. त्याचा उद्देश “शेती व्यवसाय आर्थिक स्थैर्य देणारा कसा होईल” यासंबंधीचे चर्चेद्वारा मार्गदर्शन असा आहे. शेतीसंबंधी आम्ही करीत असलेल्या संशोधनाची त्याला जोड आहे. यामधील माहिती सोप्या भाषेत सांगण्याचा आमचा प्रयत्न असेल. शेतीसंबंधीचे पारंपारिक ज्ञान व अनुभव याला शेती विज्ञानाची जोड, व्यवस्थापन, पूरक उपक्रम अशा विविध अंगांनी विचार करून हा प्रयोग आम्ही करीत आहोत. वाचकांनाही त्याचा फायदा होईल व ते अशा प्रकारचे प्रयोग करतील अशी अपेक्षा आहे. प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील माहितीला धरून त्यामधील त्रुटी, त्यासंबंधी अधिक माहिती / कल्पना आम्हाला जरूर कळवाव्यात. आमच्या गृपमधली तज्ञमंडळी त्यावर विचार करून उपयुक्त माहिती सांगतील व ती या गृपवरती प्रसिद्ध केली जाईल.
श्रीमती आरवी प्रभूघाटे
( संशोधन सहाय्यक व मुख्य अधिकारी, शेती दवाखाना
कोतापूर, ता. राजापूर, जि. रत्नागिरी )
दर महिन्याला पहिल्या आठवड्यात मराठीमधे तर शेवटच्या आठवड्यात इंग्लीश मधे ” संवाद ” आपल्या भेटीला येईल .
संकलन : श्रीमती आरवी प्रभूघाटे
भाषांतर व शुद्धलेखन : श्रीमती अनघा आपटे
सल्लागार व सहाय्यक : डॉ. आपटे, डॉ. कुन्दु, डॉ. श्रीमती देवधर डॉ. श्रीमती थळे, श्रीमती पाटणे
अधिक माहितीसाठी संपर्क –
ई-मेल – [email protected]
Sanvad
(For agriculture professionals in Ratnagiri and Sindhudurg districts Maharashtra, India)
Introduction
Namaste,
“Sanvad” is a forum especially for youths in agriculture profession. The purpose is to guide them management of agriculture as economically viable activity. We have attempted to explain the subject in simple language to provide operationally effective knowledge. Traditional knowledge, experience, science of agriculture, management are all important to make agriculture sustainable. It is an exploratory study and we invite from readers additional information or lacunae, new ideas and suggestions. We look forward to new groups who will in us in such experiments.
Mrs. Aarvi Prabhughate
(Research assistant and chief – Agriculture clinic,
Kotapur, Taluka Rajapur
Dist. Ratnagiri, Maharashtra)
Compilation – Mrs Aarvi Prabhughate
Translation and proofreading – Mrs Anagha Apte
Advisors – Dr. Apte, Dr. Kundu, Dr Barve
Dr. Mrs. Deodhar, Dr. Mrs. Thale, Mrs. Patne
संवाद मध्ये दर महिन्याला पुढील तीन विषयांवर माहिती दिली जाईल /Following three subjects will be published every month –
1. शेती व्यवसाय व्यवस्थापन
2. संशोधन
3. पूरक विचार