शेती व्यवस्थापन
फुलझाडे व भाजीपाला
या सत्रात आपण, ज्यांचे कोकणात उत्पादन घेता येईल व ज्यांच्यापासून अर्थार्जन होऊ शकेल अशी फुलझाडे व भाजीपाला यांची माहिती घेणार आहोत. प्रथम फुलझाडांचा विचार करूया.
कोकणात आपल्याला विविध प्रकारची फुलझाडे पहायला मिळतात. उदा. सोनचाफा, मोगरा, जास्वंद, गुलाब, तगर, प्राजक्त, रातराणी, अबोली, कर्दळ, शेवंती, झेंडू, अनंत, कृष्णकमळ, कमळ, कवठीचाफा इ. परंतू या सर्व झाडांमध्ये विशेषतः गुलाब, चाफा, झेंडू, शेवंती यांना जास्त मागणी असते. मोठ्ठ्या जागेमध्ये किंवा एकत्रितपणे लागवड करून उत्पादन घेतले तर ते फायद्याचे होईल का हे प्रयोगांती ठरवावे लागेल. फुले ही नाशीवंत असल्याने जवळच्या व स्थानिक बाजारपेठेचाच विचार करावा लागेल.
कोकणात सड्याच्या भागात पावसाळ्यात विविध रंगांची व विविध प्रकारची फुले उगवतात. त्यांचा कालावधी पण थोडासाच असतो. तरीही सड्याच्या मोठ्ठ्या भागात योजनापूर्वक त्याचे बी पेरता आले तर ते पर्यटकांसाठी एक आकर्षण होईल.
आपल्या रोजच्या आहारात येणार्या भाज्यांचे साधारणतः पालेभाज्या, फळभाज्या व कंदमूळे अशा तीन प्रकारात वर्गीकरण करता येईल. कोकणात हंगामाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्यांची लागवड केली जाते. काही भाज्यांचे उत्पादन बारमाही घेता येते. ढोबळमानाने वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येईल.
पावसाळा – टाकळा, कुरडू, दुधीभोपळा, लालभोपळा, पडवळ, दोडके, घोसाळे, कणंग, रताळे, सुरण, मिरची इत्यादी.
हिवाळा – मुळा, पालक, चवळी, माठ, पोकळा, राजगिरा, गवार, भेंडी, वांगी, टॉमेटो, चवळीच्या शेंगा, मिरची इत्यादी.
अशा प्रकारच्या भाज्यांचे चांगल्याप्रमाणात उत्पादन घेता येईल. परंतू पालेभाज्यांसारख्या ज्या भाज्या नाशीवंत असतात त्या भाज्या गागावांतून अथवा स्थानिक बाजारपेठेत विकता येतील. त्यासाठी मध्यम आकाराचे वाहन घेऊन थोड्याप्रमाणात उत्पादन करणार्यांकडून या भाज्या विकत घ्याव्यात. व संध्याकाळी ठरलेल्या दिवशी, मोक्याच्या जागी किंवा गागावात नेऊन विकाव्यात. असा व्यवसाय करून बघता येण्यासारखा आहे. तर जास्त कालावधीसाठी टिकणार्या भाज्या गावागावातून किंवा स्थानिक बाजारपेठेत किंवा थोड्या मोठ्ठ्या तालुकास्तरीय बाजारपेठेत विक्रीसाठी नेता येतील.
पुढील सत्रात औषधी वनस्पतींची माहिती घेऊया.
August 2022
Management of Agriculture
Vegetables and Flowering Plants
We will consider vegetables and flowering plants grown in Kokan and which are beneficial as earning source.
There are number of flowering plants in Kokan. Sonchpha, Mogara, Jaswand, Gulab, Tagar, Prajakta, Ratarani, Aboil, Kardal, Shevanti, Zendu, Anant, Krish-kamal, Kamal, Kavathichapha etc. The demand is more for Gulab, Chapha, Zendu and Shevanti. Doing plantation of such flowers in larger area may be financially profitable. Nearby towns and distinct area markets will be useful for sale. Someone has to do it on experimental basis.
Following idea may be useful. On the barren land on the top of the hill one can see number of flowers of different varieties and colours in rainy season. Proper planning and plantation of such plants can create a beautiful site for visitors.
Now we will consider vegetables–
One can have leafy vegetables, vegetables from fruits of underground roots. Different vegetables can be grown in different seasons.
In rainy season – Takla, Kurdu, Pumkin, Padval, Dodake, Ghosale, Kanang, Ratale, Suran, Mirchi etc.
In winter – Mula, Palak, Chavali, Math, Pokala, Rajagira, Gawar, Behendi, Wangi, Tomato, Mirchi etc.
Since these vegetables are perished in a few days, to sale it in villages or taluka places can be problematic. One can think of on following business. Purchase one small size carrier, collect vegetables from farmers in villages and sale it at strategic locations like near bus stand etc. Those vegetables which remain in good condition for a longer time can be marketed at Taluka or district places.
In short it is possible to create a local market provided the vegetables are cheaper compared to those coming from distant places.
We will think about Medicinal Plants in next session.