पूरक विचार
तरूण – तरूणी व विवाह
आपणजूनच्या सत्रात अनौपचारिक शिक्षण सर्वांनाच व विशेषतः तरूण वर्गाला कसे आवश्यक व उपयुक्त आहे ते बघितले. शिक्षण, अर्थार्जन या बरोबर त्यांच्या पुढे उभा राहतो तो जोडीदार निवडण्याचा प्रश्र्न म्हणजेच लग्नाचा.
भारतीय समाज म्हणून एकत्रितपणे रहायला जे अडथळे आहेत ते लग्नाच्यावेळी पण असतातच. प्रांत, भाषा, खेडेगाव/शहर, धर्म या माणसामाणसात असलेल्या दर्यांशिवाय सर्वात जास्त महत्वाचा पैलू म्हणजे जात. जातीतील श्रेष्ठ-कनिष्ठता या शिवाय त्यातील चालीरीती, वैचारिक बैठक अशा अनेक गोष्टी संसारात कटुता आणायला कारणीभूत ठरतात.
आता आपण खेडेगावातील तरूणांच्या जगामध्ये लग्न या विषयासंदर्भात डोकावूया. खाली काही उदाहरणे देतो. नावे काल्पनिक आहेत हे लक्षात ठेवावे.
- केतकी व वरूण एकाच शाळेतले. 10वीच्या परिक्षेचे टेंशन दोघांनाही. केतकी थोडी हुषार असल्याने वरूण तिच्याकडूनच शिकायचा. त्यामुळे जवळीक वाढली. लग्न करायचे हे त्याकाळातच ठरले. वरूणने मधेच शाळा सोडली. मिळेल ती कामे करणे व बाकी मोबाईल असे त्याचे जीवन. केतकी थोडीफार पुढे शिकली व घरच्यांच्या विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न केले. कमाई बेताचीच. रोज भांडणे. दारूच्या व्यसनाने वरूण रोगग्रस्त होऊन देवाघरी गेला. केतकी भावांच्या आधाराने कशीबशी जगते आहे.
- एका उच्च जातीतल्या मुलाने जातीतलीच मुलगी हवी म्हणून इंटरनेटवरून शोध घेअन दुसर्या प्रांतातील मुलीशी लग्न केले. भाषा, चालीरीती या टेंशनने पत्नी सारखी आजारीच असते.
- दुसरे असेच एक जोडपे. मुलगी चांगली पदव्युत्तर शिक्षण घेतलेली. सासू-सासर्यांना नातूच हवा म्हणून 4 वेळा गर्भपात.
नवीन पिढीने आयुष्य असे ओढतच जगायचे का? बदलत जाणार्या जगात आईवडील व तरूण पिढी यांच्यामध्ये संवाद होऊन खालील गोष्टींचा विचार होऊ शकेल का?
- विवाह संस्थेच्या इतिहासात न शिरता असे म्हणता येईल की वैयक्तिक व सामाजिक जीवनात स्थैर्य आणण्यासाठी स्त्री-पुरुषांनी विवाह करणे हे जगभर आढळते.
- विवाहानंतर घरची जबाबदारी, मुलांची जबाबदारी हे ओघानेच आले.
- बदलत्या जगात कमीतकमी सुखसोयींनी रहायचे म्हटले तरी पैशाची अडचण ही सर्वसाधारणपणे सर्वांनाच जाणवते. ही जबाबदारी आपण कशी पार पाडणार याचा अगोदरच विचार करून ठेवावा.
- लग्नविधी हा तर आनंदाचा सोहळा. त्यामध्ये भांडणे-तंटे आढळतात. प्रतिष्ठेचा प्रश्र्न न करता कमी खर्चात विवाह करायला काय हरकत आहे?
- दोन कुटुंबातील चालीरीती, सामाजिक जीवन याबद्दल खरे तर त्या दोन्ही कुटुंबांनी मोकळेपणाने चर्चा करण्याची पद्धत ठेवावी.
तरूण पिढीनेच असे बदल करायला सुरुवात करावी.
पुढील सत्रात आपण रोगोपचारावर होणार्या खर्चाविषयी विचार करुया.
August 2022
Supportive Thinking
Youths and Marriage
In the earlier sessions we discussed the problems of education and financial stability of young generation. At this age, another problem is of choosing life partner, means marriage.
There are number of troublesome issues in India to live as a unified strong society. The state you belong to, language, village/city, religion etc. The most piercing problem is caste. Besides upper caste or lower caste, the differences exist between educational and socio-cultural aspects of different castes. These may create conflicts in married life.
Let us examine the world of youths at village level in the context of marriage. Please note that the names mentioned below are imaginary.
- Ketki and Varun were in the same class in school life. In 10th standard everyone is tensed and both of them were not exception. Ketki was clever than Varun and used to guide him in studies. Both decided to get married as life partners. Varun left school after 12th and started working here and there and rest of the time mobile. After graduation Ketki, with a sfiff opposition from parents, got married with Varun. With meagre income they faced lot of difficulties, leading to everyday quarrels. Varun god addicted to alcohol and died due to liver disease. Ketki is living with her brother.
- One boy from upper caste married to a girl from the same caste from a different state. Wife used to fall sick often due tension because of different language and socio-cultural customs.
- One girl has to undergo 4 abortions as in-laws wanted a boy.
Is it a future life for younger generation? Can there be a dialogue between parents and children on such issues?
- Marriage as a custom for stability in individual and social life is a universal phenomenon.
- After marriage the couple has responsibility of house and their children.
- In changing world even living with minimum comforts needs reasonable income. Before becoming life partners they can discuss such issues before marriage.
- Marriage ceremony is an occasion to get together and enjoy. Can we put aside status and the resultant quarrels by cutting off unnecessary expenses?
- Can two families have a dialogue on various matters before marriage.
Young generation can think seriously on these matters.
In next session we will discuss about diseases and treatment expenses.