सप्टेंबर 2022

 संशोधन

रोगाचे झाडांच्या शरीरकार्यावर होणारे परिणाम

मागील सत्रात आपण रोग कसा होतो व वाढत जातो ते अभ्यासिले. आता आपण रोगाचा झाडांच्या शरीरकार्यावर काय परिणाम होतो ते बघणार आहोत.

सुरवातीला आपण वनस्पती व इतर प्राणी (यामध्ये मनुष्यप्राणीही आला) यांमध्ये एक ठळक फरक दिसतो (असतो) तो बघूया. तो फरक म्हणजे अन्न मिळविण्याचे कार्य.  आपण व इतर प्राणी यांचे अन्न वनस्पती किंवा  प्राण्यांपासून मिळते. या उलट वनस्पती नैसर्गिक घटकांपासून म्हणजे सूर्यप्रकाश, हवा, पाणी व शोषण केलेले क्षार यांपासून अन्न तयार करतात. या प्रक्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डाय ऑक्साईड घेतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात. पानांमधील हरितद्रव्याचा (क्लोरोफिलचा) यामध्ये सहभाग असतो. अन्न बनविण्याची क्रिया क्लोरोप्लास्ट नांवाच्या पेशींमध्ये होते. या पेशी प्रामुख्याने पानांमध्ये असतात. ग्लुकोज व इतर प्रकारची साखर, प्रथिने, स्निग्ध पदार्थ अशी वेगवेगळी रसायने अन्न म्हणून झाडात असतात.

  1. पाने – वरील विवेचनावरून लक्षात येईल की पानांमध्ये अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमधे अनेक कार्ये होत असतात. रोगजंतूंनी किंवा नैसर्गिक घटकांनी म्हणजे वारा, ऊन, पाऊस ये कारणांनी झाडे कुरतडली गेली तर वेगवेगळे रोगजंतू त्यामधून झाडांवर हल्ला करतात. पाने पिवळी पडणे, गळणे, पानांवर विविध प्रकारचे डाग दिसणे अशी एक किंवा अनेक लक्षणे पानांमधील कार्य बिघडल्यामुळे दिसतात. ऑक्सिजन व कार्बन डाय ऑक्साईड वायू यांच्या देवाणघेवाणीवर परिणाम होऊन झाडांमधील श्र्वसनक्रियेवर त्याचा परिणाम होतो.
  2. मूळे व खोड – मूळांकडून शोषले गेलेले पाणी व क्षार, तसेच पानांमध्ये तयार झालेले अन्न झायलम नांवाच्या नळीसारख्या पेशींमधून झाडाच्या इतर भागात पसरले जाते हे आपण अगोदरच्या सत्रांतून बघितले आहे. रोगजंतूंमुळे या नळ्यांचे हे कार्य बिघडते किंवा बंद होते. त्याचा परिणाम मूळे, खोड यांच्या कार्यावर होतो.
  3. पुर्ननिर्मितीची क्रिया – पुर्ननिर्मितीची क्रिया प्रामुख्याने फुलांमध्ये होते. रोगजंतूंनी फुले व फळांवर हल्ला केला तर फुले, तसेच फळे खराब होतात. गळून पडतात. त्यामुळे पुर्ननिर्मितीचे काम ठीक होत नाही. निर्मिती झालीच तर नवीन होणारी झाडे दुबळी होतात. त्यांची वाढ  नीट होत नाही.

पुढील सत्रात आपण  रोगजंतू झाडांवर हल्ला कसा करतात ते बघणार आहोत.

September 2022

Research
Effects of disease on physiological functions of plants

In the last session we discussed how disease starts and spreads in the plants. In this session we will see the effects of disease on physiological functions of the plants.

There is a remarkable difference between plants and animals including human being. The main difference is of getting food. Human beings and other animals depend on plants and other animals for food. On the other hand, plants prepare their good from natural sources such as sunlight, air, water and minerals absorbed from the soil. In this process plants take Carbon-di-Oxide from air and release Oxygen in the air in return. Chlorophyll present in the leaves participates in this process. The process of food preparation takes place in Chloroplast tissues, which are mainly present in the leaves. The chemicals like glucose, different types of sugars, proteins and fat are present in the plant as their food.

  1. LeavesFrom the above information we see that in the process of food preparation many different functions are occurring. If the leaves get tared due to attack of pathogens or natural factors such as wind, heat or rain, different pathogens can enter through the openings in the leaves and attack the plant. Due to this attack the functioning of leaves is disturbed. This shows symptoms such as formation of spots on the leaves, dropping and yellowing of leaves etc. This leads to irregularity in giving and taking of Oxygen and Carbon-di-Oxide. Due to it the respiration in the plants is affected.
  2. Effects of disease  on roots and stems of the plants In the previous session we have seen that two tube like tissues named Xylem and Phloem transport water , minerals absorbed by roots and food prepared in the leaves, to different parts of the plant. Due to the attack of pathogens this process deteriorates or stops. Due to this the functions of roots and stems are affected.
  3. Reproduction processIn many plants, reproduction takes place in flowers. Flowers and fruits get damaged, they drop down due to attack of pathogens. Because of it reproduction process does not take place properly. If at all reproduction occurs the plants which are reproduced are week and they do not grow healthy.

In the next session we will see how pathogens attack the plants.