पूरक विचार
जीवनशैली: एक नवीन प्रयोग
शहरी जीवन व पैसा
संदर्भ: Dr. S. S. Apte यांचे लेख
माणसे शहराकडे धाव का घेतात? उत्तर सोपे आहे. कमी श्रमात मिळणारा पैसा व सुखसोयी. आर्थिक दृष्टया शहरी माणसांची 3 स्तरांवर विभागणी करता येईल. एक वर्ग म्हणजे शहरात येऊनही दारिद्रयात जगणारा, दुसरा पैशात लोळणारा. क्वचित अपवाद वगळता या दोन्ही वर्गांना वेगवेगळ्या कारणांनी ही लेखमाला निरर्थक अहे. तिसरा स्तर म्हणजे मध्यमवर्ग. पूर्वीचा मध्यमवर्ग सध्या दोन भागात दिसतो. एक श्रीमंतीकडे झुकणारा, तर दुसरा कनिष्ठ मध्यमवर्ग म्हणूया पाहिजे तर. या लेखमालेतील विचार जाणून घेण्याची व आचरणात आणण्याची क्षमता या वर्गांत आहे. त्यामुळे या प्रयोगाचे भवितव्य खरे तर या वर्गांतील लोकांवर अवलंबून आहे . अपवादात्मक पहिल्या दोन स्तरातील माणसेही यामध्ये सहकार्य देतांना आढळतील.
शरीर व्यवस्थापनाची प्रतिकृती (model) आपण तुलनेसाठी घेणार अहोत. व्यवस्थापन या विषयात पैसा हा सर्वात महत्वाचा. शरीरामध्येही ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट (ATP) नावाचे द्रव्य असते. हे रासायनिक द्रव्य म्हणजे शरीरातील नाणे म्हणायला हरकत नाही. पैसा जसा आपण आपल्याला जे काही हवे असते त्यासाठी वापरतो तसेच पेशींना हे द्रव्य त्यांच्या व्यवहारासाठी लागणारी शक्ती देण्याचे काम करते. पेशींना त्या द्रव्याचा पुरवठा कसा होतो व त्याचा विनियोग पेशींकडून कशा रितीने होतो? त्याचे उत्तर म्हणजे, आवश्यकता असेल तेवढा पुरवठा होतो व विनियोग ही योग्य रितीने होतो. पेशींचेही यामध्ये सहकार्य असते. या द्रव्याची जेव्हा जरूरी असते तेव्हा पिष्टमय पदार्थांकडून त्याचा पुरवठा होतो. नंतर शरीरातील प्रथिने व स्निग्ध पदार्थ वापरले जातात.पण शक्तीचा साठा असावा म्हणून स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर ते त्वचेखाली साठून स्थूलता येते. त्याचे पुढे होणारे दुष्परिणाम आपणाला माहीतच आहेत. थोडक्यात, आवश्यक घटकांचे वितरण व वापर योग्य रितीने होणे शरीर स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. त्याचप्रमाणे समाज व्यवस्थेमध्येही पैशाचे वितरण व वापर योग्य प्रकारे झाला तर समाज सुखी होईल.
राजसत्ता, लोकशाही, कम्युनिझम् अशा अनेक प्रयोगांद्वारे समाजस्वास्थ्य टिकविण्याचे प्रयोग झालेले दिसतात. अजूनही तसे प्रयोग चालू आहेत. एका वेगळ्या दृष्टीकोनातून त्याकडे बघूया. शरीरस्वास्थ्यात जशी प्रत्येक पेशी स्वतच्या, इंद्रीयाच्या व शरीराच्या स्वास्थ्याला मदत करते, तसेच प्रत्येक माणसानेही अशा प्रकारे विचार केला तर त्याचे, कुटुंबाचे व समाजाचेही भले होईल.
माझे ठीक चालले आहे. समाजाचा विचार, समाजकार्य वगैरे भानगडीत पडून मनस्ताप मात्र होत रहाणार. हे उत्तर बऱ्याच जणांकडून अपेक्षित आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे समाजाचा जर आपण विचार केला नाही तर सध्याच्या तरुण पिढीच्या मुलाबाळांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्या समस्यांचा उल्लेख अगोदर आला आहे. पण त्या महत्वाच्या असल्याने परत आठवण करून देतो. एक म्हणजे पैसा हेच आयुष्याचे ध्येय झाल्याने परस्परांमधील विश्र्वास, प्रेम याची घसरण. दुसरे तितकेच महत्वाचे म्हणजे नैसर्गिक संपत्तीचा ऱहास. परदेशातही या समस्या आहेत. परंतु तेथे ज्ञान संवर्धन मोठ्या प्रमाणावर होत असते. त्याचबरोबर ईर्षा, प्रबळ देशप्रेम याची त्याला साथ असल्याने समस्या सुटण्यास मदत होते.
प्रथम पैशाकडे वळूया. सध्या वर वर्णन केलेल्या वर्गाकडील पैसा कुठे जातो? जागा, मुलांचे शिक्षण, औषधोपचार या प्राथमिक गरजांचेच बाजारीकरण एवढे झाले आहे की काही वेळा त्याचे गणित बसविणे कठीण असते. उपाय? यामध्ये बदल घडविणे हे वेळ लागणारे काम आहे. असे असले तरी दोन गोष्टी नक्की करता येतील.
- आपण ज्या व्यवसायात आहोत तो मानवी जीवनाला कशा रितीने समृध्द बनवितो हे लक्षात घेऊन त्यामध्ये मन लावून काम करणे. उदहरणार्थ, शिक्षकांनी जास्तीत जास्त चांगले शिकविण्याचा प्रयत्न करावा, क्रिकेटीअर्सनी खेळावे, डॉक्टर्सनी आपली बुध्दी रुग्णाच्या अभ्यासात खर्ची घालावी. तसे करत असतांना त्या व्यवसायाच्या बाजारीकरणात भाग घेऊ नये.
- काही जाणांकडे जास्त असलेला पैसा ही मंडळी मग शेअर्स, फार्म हाऊस, वेगवेगळ्या ठिकाणी जागा घेणे अशा गोष्टीत गुंतवितात. ती काही विचारपूर्वक केलेली योजना असते असे नाही. तसे करण्याऐवजी तो पैसा त्यांना सुसंस्कृत समाज घडविण्याकडे वळविता येईल. म्हणजे नेमके काय करता येईल याचा विचार करावा लागेल. ज्यांच्याकडे पैसा नसेल पण ज्ञान असेल, अगर वेळ असेल तर त्याचाही उपयोग अशा कामामध्ये होऊ शकेल. कसा याचा विचार आपण सर्वानीच करायाला हवा.
February 2024
Supportive thinking
Thinking and Thoughts
Ref.: Articles by Dr. S.S. Apte.
City Life and Money
Why do people rush to cities? The answer is easy money and lots of comforts and amenities. Currently, one can observe city people at 3 levels depending on their economic status. On one hand there is one section living in poverty while at the other end there a few who are rolling in money. With few exceptions, this series of articles may not appeal to these two segments of the society. The third level is the middle class.
The erstwhile middle class is now divided into two sections. The one tending towards the wealthy class while the other one, we may call it as lower middle class. The people from the middle class have capacity to understand and participate in the experiment put forward in these articles. The future of this experiment depends on their participation. Exceptionally one can expect cooperation from people of the earlier two categories.
We are going to take management system of our body functioning as model for our experimental design. Money is one of the crucial point when we think of Management. In out body there is a chemical called Adenosine Triphosphate (ATP).This chemical can be regarded as the currency in our body functioning. We use money for our day to day work. Similarly ATP provides energy to cells so that they can perform their functions. How much ATP the cell receives and how it is spent? The answer is – as per the need. The cells co-operate in this process. Whenever body needs energy first the carbohydrates are used. If necessary, proteins and fats are utilized to provide energy. If one eats more fats to have more and more energy, the excess is stored as fat under the skin and obesity is the result. We all know the consequences of obesity. Similarly in the contest of society if the money distribution and utilization occur in the proper manner one can experience a happy social life.
Different approaches of governance have been tried for stability and wellbeing in society like kingship, democracy, communism and so on. Let us look at the problem from a different angle. Just as in the body each cell tries to maintain itself, the organ and the whole body, if every individual tries and acts in similar fashion it will be conducive not only for his health but for the well being of his family and society.
“I am doing well. Why to disturb my peaceful life by thinking of societal good, social work and so on?” This answer is expected from most of us. If we do not look into these social problems right now the children of the present young generation are going to face very difficult situation. These problems have been mentioned earlier. Since they are important let me remind them again. Earning money has become the aim of life leading to loss of mutual trust, love and faith. Equally important is the issue diminution of natural wealth. Similar problems are there in western countries too. However the problems are solved through pursuance of knowledge. Besides, their nationalistic spirit and determined efforts make it easier to solve the issues.
Let us turn to money. Where does money flow from the middle class society mentioned earlier? Commercialization has entered in to the areas like accommodation, education, medical treatment etc. to such extent that one finds it a difficult calculation to make provision even for these primary needs. What is the solution? It will take quite some time to find some changes in the current situation. However, couple of ways are suggested for immediate action.
- Whatsoever one’s profession, one should think about its need and utility for social life and work with devotion. For example, teachers should try to teach in the best possible way, cricketars should play, physicians should apply their intelligence for the study of patients. One should avoid commercialization entering into personal conduct while working.
- We find some people investing money in shares, farm house, in buying flats and so on. There is no well thought out plan in such investments. Instead, it is possible to divert that money to have a better and cultured society. We have to think over it. Some people may not have money but may have time, which can be utilized for such work of societal benefits. But how? We all should think over it.