शेती व्यवसाय व्यवस्थापन
वनस्पती दवाखाना
संदर्भ : Plant pathology ( Author- George Agrios)
वनस्पती रोगनिदानशास्त्र म्हणजे रोगकारक जीव , रोग निर्माण करणारे वातावरणीय घटक, रोगाचे विविध टप्पे तसेच रोग नियंत्रणासाठीच्या उपाययोजना या सर्वांचा अभ्यास. वनस्पती रोगनिदानशास्त्रात विज्ञानाच्या विविध शाखा उदा. वनस्पतीशास्त्र, बुरशी अभ्यासशास्त्र, सूक्ष्मजंतूशास्त्र, विषाणूशास्त्र, वनस्पती शरीरशास्त्र, वनस्पती शरीर विज्ञान, जननशास्त्र, आण्विकजीव शास्त्र, जैवतंत्रादन, जीवरसायनशास्त्र, फलोत्पादन, कृषीशास्त्र, उती संवर्धन, मातीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र,वनीकरण, हवामानशास्त्र इ.शाखांतील मुलभूत माहिती व ज्ञान एकत्रित करून त्याचा उपयोग केला जातो. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, अशा वेळी सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण करण्याकरिता वनस्पती रोगांवर नियंत्रण करणे व उपाययोजना करणे ही एक मुलभूत गरज झाली आहे. वनस्पती रोगांबद्दल ज्ञान वाढविण्याचा व त्याचवेळी वनस्पती रोग होऊ नयेत यासाठी आणि त्यांच्या नियंत्रणासाठी विविध पद्धती, साधने, त्या विषयी साहित्य यांची निर्मिती करण्याचा प्रयत्न हे शास्त्र करते. या शास्त्राच्या आधुनिक संशोधनाचे ध्येय रोग नियंत्रणाचे नैसर्गिक उपाय शोधणे हे आहे. अन्नधान्य उत्पादनातील घट थांबवणे, अन्नधान्याची गुणवत्ता वाढवणे तसेच निसर्गाचे संरक्षण करणे हे या शास्त्रासमोरील मोठे आव्हान आहे.
सन १८०० मध्ये युरोपातील जीवशास्त्रज्ञ, निसर्गतज्ञ व अनेक डॉक्टर्स यांनी वनस्पतींच्या रोगनिदानासाठी केलेल्या अभ्यासातून वनस्पती रोगनिदानशास्त्राची सुरुवात झाली. नंतर युरोपातून युनायटेड स्टेट्स मध्ये या अभ्यासाचे स्थानांतरण झाले, ते आजपर्यंत जगभर सर्वत्र सुरु आहे. हळूहळू मागणी कृषी संशोधन केंद्र, फेडरल कृषी खाते, विद्यापीठे यांच्या कडून वनस्पती रोगनिदान शास्त्रज्ञांची होऊ लागली. १८९१ मध्ये नेदरलेंड येथे नेदरलेंड सोसायटी ऑफ प्लांट पॅथॉलॉजी ची स्थापना झाली व त्यांनी १८९५ पासून या शास्त्राच्या संदर्भात जर्नल प्रकाशनास सुरुवात केली. त्यानंतर जपान ( १९१८), कॅनडा ( १९३० ),व भारत येथे (१९४७ ) या देशांमध्ये जर्नल प्रकाशनास सुरुवात झाली. २० व्या शतकाच्या अखेरीस बऱ्याच देशांमध्ये एक किंवा अधिक व्यक्ती वनस्पती रोगनिदान शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागल्या. काही देशांमधील विद्यापीठांमध्ये सुध्दा अशी व्यक्ती अध्यापक म्हणून काम करू लागली. त्यानंतर हळूहळू जगभरातून वेगवेगळ्या अन्नधान्यांवर संशोधनास, प्रयोग करण्यास सुरुवात झाली, इतकेच नाही तर जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात आली. यातील काही संशोधन केंद्रे पुढीलप्रमाणे :
- International Rice Research institute in Philippines (1960)
- International Maize and Wheat improvement centre in Mexico (1966)
- International institute of tropical agriculture in Nigeria (1968 )
- International centre of tropical agriculture in Colombia (1969)
यासारख्या संशोधन केंद्रांच्या यशामुळे, 1972 साली भारतात International crop research institute for semi arid tropics, पेरू देशात International potato centre, तैवान मध्ये Vegetable research and development centre अशा कृषी संशोधन केंद्रांची स्थापना झाली. आज घडीला जगभर अशा केंद्रांचा बराच प्रसार झाला आहे. या सर्व केंद्रांमध्ये होणाऱ्या संशोधनामुळे उत्पादनात होणारी संख्यात्मक व गुणात्मक घट कमी होऊ लागली आहे. वनस्पती रोगनिदानशास्त्राच्या अभ्यासक्रमाची सुरुवात प्रथम १८७५ साली हार्वर्ड विद्यापीठात झाली, तसेच या शास्त्रावर पुस्तके लिहिण्यासही सुरुवात झाली. इतकेच नाही तर या शास्त्रात पदवी,पदव्युत्तर ते पीएचडी पर्यंतचे अध्ययन व अध्यापन सुरु झाले. त्यावेळी वनस्पतीच्या रोगांवर इलाज करणारे डॉक्टर, त्यासाठीचा अभ्यासक्रम उपलब्ध नव्हता. अशा डॉक्टरकीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात सर्वप्रथम सन २००० साली फ्लोरिडा विद्यापीठातील college of agriculture and life science येथे झाली.
नंतर अशा या वनस्पती रोगनिदानशास्त्र खात्यामार्फतच वनस्पती रोग दवाखाना ही संकल्पना मांडण्यात आली व वनस्पती दवाखाना चालवला जाऊ लागला. काही देशांमध्ये असे दवाखाने सुरु आहेत. या शास्त्राचा विकास सर्वत्र होत आहे. या दवाखान्यात वनस्पती रोगनिदानशास्त्र या शाखेतील ज्ञानाचा वापर करून पिकांवरील रोगांचचे निदान करून त्यावर योग्य ती उपाययोजना सुचवली जाते. तसेच त्या दवाखान्यात वनस्पतींवरील विविध रोगांचा अभ्यास, संशोधन व प्रयोग केले जातात. या दवाखान्यात वनस्पती रोगनिदानशास्त्र या शाखेचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीची नेमणूक करण्यात येते. रोग निदान करण्यासाठी रोग झालेल्या वनस्पतीचे नमुने, रोग झालेली वनस्पती ज्या मातीत आहेत त्या मातीचे नमुने व त्या भागातील विविध कीटकांचे नमुने वनस्पती दवाखान्यात जमा केले जातात. यांचा एकत्रित अभ्यास करून रोग निदान केले जाते. येथे रोग निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. त्यासाठी आवश्यक सर्व साहित्य व उपकरणे येथील प्रयोगशाळेत असतात.
सध्या प्राथमिक स्वरुपात अशा तऱ्हेचा वनस्पती दवाखाना ए.आर.एच. च्या कोतापूर येथील केंद्रात कार्यरत आहे. येथे वनस्पतींवरील रोगांचे निदान करून होमिओपॅथीची औषध योजना सुचवली जाते. येथे केल्या जाणाऱ्या विविध प्रयोगांचा तसेच संशोधनाचा आढावा आपण संवाद च्या “संशोधन” या विभागात घेत आहोत.
पुढील सत्रात (ऑगस्ट २०२३) आपण झेंडू लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत.
May 2023
Management of Agriculture
Plant clinic
Ref.: Plant pathology (Author – George Agrios)
Plant pathology is the study of the organisms and environmental factors that cause disease in plants; of the mechanisms by which these factors induce disease in plants; and of methods of preventing or controlling disease and reducing the damage it causes.
Plant pathology is an integrative science and profession that uses and combines the basic knowledge of Botany, mycology, bacteriology, virology, nematology, plant anatomy, plant physiology, genetics, molecular biology and genetic engineering, biochemistry, horticulture, agronomy, tissue culture, soil science, forestry, chemistry, physics, meteorology and many other branches of science. Plant pathology tries to increase our knowledge about plant disease. At the same time, plant pathology tries to develop methods, equipment and materials through which plant disease can be avoided or controlled. The challenges for plant pathology are to reduce food losses while improving food quality and, at the same time, safeguarding our environment. As the world population continues to increase while arable land and most other natural resources continue to decrease, and as our environment becomes further congested and stressed, the need for controlling plant diseases effectively and safely will become one of the most basic necessities for feeding the hungry billions of our increasingly overpopulated world.
Plant pathology had its origin in plant pathological observations and studies made by botanists, naturalists and physicians in Europe in the mid-to late 1800s. Soon after, plant pathological activity shifted primarily to the United States, where it has remained at a high level to date. Plant pathologists began be hired as plant pathologists by state agricultural experiment stations, by the federal department of Agriculture, and by the universities at which they taught courses in plant pathology. In 1891, the plant pathologists in the Netherlands formed the Netherlands society of plant pathology and began publishing Netherlands Journal of plant pathology in 1895. In subsequent decades several countries e.g. Japan(1918),Canada(1930) and India(1947) began to publish plant pathological journals. By the end of 20th century most or all countries have one or more plant pathologists, although in many developing countries that person is an administrator of some kind or a professor at a university.
In the mid-1940s some countries established a program for interdisciplinary research on basic food crops, later many countries began to establish International Agriculture Research centre out of which some are, International Rice Research Institute in Philippines (1960), International Maize and Wheat Improvement centre in Mexico (1966), International Institute of Tropical Agriculture in Nigeria (1968), the International centre of Tropical Agriculture in Colombia (1969). The success of these centres suggested the need for additional ones, which include International Crop Research centres Institute for the semi-Arid Tropics in India (1972), the International Potato centre in Peru (1972), Vegetable research and Development centre in Taiwan (1972). Each of the afmore mentioned centres studies and works on plant diseases which have helped to significantly reduce losses of crops caused by plant diseases.
The first course in plant pathology was offered at Harvard University in 1875. In the early 1900s, some of larger universities started course in plant pathology, later general textbooks in plant pathology appeared in several languages. Later several departments of plant pathology started offering B.S.andM.S. degree and PhD. In plant pathology Plant pathology department does not have teaching and training programs that will produce practitioners similar to the general practitioner physicians and veterinarians. Development of a program leading to professional doctor of plant medicine or doctor of plant health degree similar to the M.D. and D.V.M. degrees, had been discussed since the late 1980s and was offered for the first time by the college of Agriculture and Life Sciences of the University of Florida in the year 2000.
Later on department of plant pathology put forward the concept of plant clinic. Inmany countries such clinics are running. Plant clinics use the information of plant pathology branch. Plant clinics diagnose plant diseases and suggest proper treatment. Also these clinics study different plant diseases and carry out research and experiments. The plant clinic hires the person who has taken the education of plant pathology. These clinics collect the sample of diseased plants, soil from areas with diseased plants and insects. The diagnosis of disease is done by the study of all these samples. Different tests are carried out to diagnose the diseases. These clinics are equipped with all the required material, equipments, instruments and medicines etc.
Kotapur centre is having a plant clinic which is at primary stage. Here we diagnose plant diseases and suggest homeopathic medicines. We are giving the information about different research and experiments carried out at this centre in our research section of Sanvad.
In the next session (August 2023) we will see cultivation of marigold.